नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं,
--आयुष्य जास्त सुंदर वाटतं...
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं
--आयुष्य जास्त सुंदर वाटतं...
कायमच
मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन
पहावं
--आयुष्य जास्त सुंदर वाटतं...
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा,
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं,
--आयुष्य जास्त सुंदर वाटतं...
चारचौघात एकटं
बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
--आयुष्य जास्त सुंदर वाटतं...
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण
कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पहावं
--आयुष्य जास्त सुंदर वाटतं...
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत;
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत;
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं,
--आयुष्य जास्त सुंदर वाटत..!!
संकलन -अभिजीत पाटिल
Post a Comment