कशीबशी करेल मी माझी पहिली चारोळी ,
आवडली नाही तर ,
नका देऊ लगेचच आरोळी..😉

*****************

 नसेल जर तुमच्या कोणाचीच हरकत ,
मि प्रस्तुत करतोय माझ्या विचारांची मिळकत ,
थोडया फार शब्दांना मनाशी जुळवत,
मि वाढवतोय माझ्या शब्दांची,चारोळ्यांची बरकत ...

 *****************
 
माझ्या मनातले शब्दांचे खेळ ,
अलवार, अलगदसा साधतात मेळ...
भावना थोड्या गहिवरताच,
लेखनीतुन उतरायला लागतो फक्त वेळ ...

 *****************
 
आहेस जशी तु ,
तशीच माझी लेखनी...
लाजून थोडंस खट्याळ बोलुन,
रुप तुझं रेखाटनारी...

 *****************
 
 साठवलेली तु आता ,
पुन्हा -पुन्हा आठवत राहते..
राञ ती सरता - सरता ,
भावनेत माझ्या वहावत येते ..

  स्वलिखित-प्रदीप माने

Post a Comment

 
Top
X