जातीचं काय घेउन बसलात राव...
आरे जात म्हणजे काय
माहित तरी आहे का.?
आरे कपडे  शिवणारा शिंपी,
तेल काढणारा तेली,
केस कापणारा न्हावी
आणि लढाई लढणारा क्षञिय..

आलं का काही डोस्क्यात😮
आरं काम म्हणजे जात...
आता भांडत बसण्यापेक्षा
जाती बदला....
आता इंजीनीयर ही नवी जात...
कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात..
"सी. ए" ही नवी जात,
"एम. बी. ए"
ही नवी जात....
बदला की राव..
कवाचं तेच धरुन बसलात...
🐂बैल गाडीतुन मोटारीत आलात नव्हं?
मोटार चालवता नव्हं?
मग काय ङ्रायव्हर का?
घरीच (स्वतःच्या हातानं) दाढी करता नवं?
मग काय न्हावी का?
बुटाला पालीश करता नव्हं?
मग काय चांभार काय?
आरं बायकोच्या धाकानं (मोजे घालुन)
संडाससाफ करता नव्हं?
मग काय.....?

आता अजुन बोलाय लावू नका
आरं जात न्हाई ती जात...न?
बरं जात नाही तर बदला की मग...
आरं कोण मोठा कोण छोटा?
ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं?
ह्यालाबी खायला लागतं
आणि त्याला
आरं कामानं मोठं व्हा,
जातीनं न्हाय...
आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,
हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?
मंग कशाला उगीचच
सगळ्याला आता काम हाय..
सगळ्याला शिक्षान हाय...
शिकायचं..
कामं करायची..
पोट भरायची ..
की हे नसते उद्योग करायचे..!

             संकलन -स्वप्निल 

Post a Comment

 
Top
X