व्ह्हय म्या पोरगा हाय
आजुन लहान हाय
पर शाळेस जातो
हुश्शार न्हाय
पर तितुक माहित हाय की ,
बापुच काम ऐकूतो
मला सारी कामं एत्यात
का ?
तर बापानं शिकवल
ंमायने बी शिकवलं
खुप सारं शिकवलं
पर आजुन बी आडानी हाय
जगाचं भान न्हाय
काय करणार बाप आडानी हाय
शिकवणारं कोणी न्हाय
म्हणुन आज म्या आडाणी हाय जीवनाचा आणि मरणाचा
काय करु समजत न्हाय
कारण म्या आडानी हाय
संकलन -सूरज पाटिल
Post a Comment