सायंकाळची वेळ, साधारण सात वाजले असतील....रोजचं धकाधकीचं जीवन.नेहमीच्या वेळी बस येते तिच्या रोजच्या थांब्यावर थांबते,आणि साधारण सहा जणांचं एक कुटुंब लगबगीने बस मध्ये चढतं ....कुटुंबात चार मुली,एक मुलगा आणि त्यांची आई.....चारिही मुली वयात आलेल्या, दिसायला साधारण काळ्या-सावळ्याचं पण उठावदार होत्या....त्यांचा भाऊ वयाने साधारण पंधरा वर्षांचाचं असेल .....मोठे पाणिदार डोळे,पिळदार शरीर,उठावदार उंची, वयाने लहानचं पण बुद्धिने आणि विचाराने अगदी मोठा....त्यांची आई अंगकाठीने सडपातऴ पोट -पाट अगदी चिकटलेलं केस विस्कटलेले आणि शुन्यात हरवलेली नजर ......एकंदर काय तर त्या कुटुंबाची परिस्थिती खुपचं हलाखिची, बेताची होती.....आपापल्य़ा कामात आणि विचारात मग्न असलेल्यांची तंद्री क्षणात तुटली,ती एका आवाजाने.......
"सोन्या, ते पैकं आन इकडं......"ती सडपातऴ बांध्याची बाई आपला तोल सावरत तिच्या मुलाशी भांडु लागली.....
"म्या नाय देणार,सांगितलं नव एकदा " तेवढ्याचं तावातावाने तो बोलला.....
बस मध्ये चाललेलं हे थरार नाट्य पाहुन बरेचं जऩ वैतागले.....एका सद्गृहस्थाने त्या मुलाला विचारलं "कोण ही बाई? "
"आई माजी " तो मुलगा उत्तरला ....अरे ,आई ना तुझी ?मग दे की पैसे तिला ....."ऩ्हाय साहेब, हिला दारु प्याया पैकं फायजे! हिला पैकं देउन खायाचं काय? सहा जणांचं पोट भरायचं कुटुन आणायचा पैसा??" काळजीच्या सुरात तो बोलला.....
घरची परिस्थिती ही अशी बेताची आणि तुझी दारु पिते....?? Strenge! !!
आता माञ त्या मुलाचा बांध फुटला त्याचं सारं अवसानचं गळालं स्वताला सावरत कसा -बसा तो बोलु लागला ...."साहेब दोन वरीस जालं माजा बा ला जाउऩ, तो हुता तवर पैशाची चऩचन हुतीचं पर आई आणि बहीन कडं वाकड्या नजरनं बगायची हिंमत नवती .....पर आता? ?येता जाता समाजाची नजर??? बिगारी कामाला जायचो आमी दोगं ....बहीनी घरी एकट्याचं आईचं काय कामात लक्ष लागना! मग म्याचं म्हणलं त्यानला बी घेऊन येऊ .....झालं रोज आमच्याबरं येऊ लागल्या पर काय करणारं? ?अंगावर अंगभर कपडा नाई उपाशी वाघाने बकरीकडं बगावं तसं समदे लोक त्यांच्याकडे बगायचे जीव पार खालीवर व्हायचा!!  बहिनींच्या रक्षणासाठी आईला ठेकेदाराच्या नको त्या गरजा पुरवाव्या लागतात .....तो ठेकेदार माज्या समोर आईला घेऊन जायचा अऩ् म्या? ????लाज वाटती मला .....दारु हौसंनं पित न्हाई ती स्व:ताची लाज वाटायला लागली की, दारु पिती......."हुंदके देत देत स्वताला सावरत तो सांगत होता .......बस तिच्या थांब्यावर थांबली ते कुटुंब बस मधुन उतरलं........पाणावलेल्या डोळ्यांनी बसमधील सगळे त्या कुटुंबाच्या पाठमोर्या आकृती कडे पाहत होते...........
         -सुकेशनी दि.कदम ...
author-pic आमच्या बद्दल थोडेसे..
नमस्कार मी सुकेशनी कदम ,मनात येणारी सगळ्या गोष्टी कागदावर उतरवने हीच आवड.

Post a Comment

 
Top
X