ओळखलंत का सर मला?
ऑफिसात आला कोणी
चेहरा होता मरुकुडलेला
डोळ्यांमध्ये पाणी
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून.
.मास्तर व्हायचं माझं स्वप्न
गेलं अर्धवट राहून
आयुष्याची अडीच वर्षे
डिएडसाठी घातली
होती नव्हती तेवढी मी
सगळी पुस्तके वाचली
गर्लफ्रेंड तुटली
फॅमिली सुटली
होते नव्हते  गेले
मित्रांकडून उधारी घेणे
माझ्या नशिबी आले
टिईटि देऊन सर
मी पुन्हा लढतो आहे
जॉब करुन पास होत नाही
म्हणून जॉबही मी सोडतो आहे
खिश्याकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला
जरा एकटेपणा वाटला
आधी डि एड डिग्री अन
आता बेरोजगारिने मोडला
माझा कणा
आज रात्री फक्त
गोल्ड फ्लैक अन
क्वार्टर चा बंदोबस्त
करतो म्हणा.....
                        संकलन -अभिजीत पाटिल 

Post a Comment

 
Top
X