अंर्तमनाची मनाची साद:
नेपाळ मधील भिषण धरनीकंपाबद्दल ऐकलं, अंगावरुन सर्रकन काटा गेला ....मनाला एक विचार अनामिक हुरहुर लाऊन गेला ...देव न करो पण तसाचं भिषण अपघात माझ्यासोबत झाला, तर आयुष्यातले शेवटचे काही क्षण जगताना .....मनात य़ेईल अरेच्चा मला हे करायचं होतं राहुनचं गेलं, ते करायचं राहुनचं गेलं ....आयुष्याच्या उत्तरार्धात ही समाधान नसेलचं, मला राहवेना राञीच्या दीड वाजता for a change म्हणुन खिडक्यींच्या स्लायडिंग वर बसले ....विचारांच काहुर माजलं होतं अगदी, विचारांची गर्दी कमी की काय म्हणुन त्यात भर भितीची .....राञीच्या त्या गडद अंधारात एकटीचं असं भुतासारखं बसनं थोडं ऑड चं वाटलं, आज प्रथमचं विचारांच्या आवाजापुढे मनाचा आवाज मोठा होता ....कदाचित मनाचा आवाज असेलही मोठा पण, माणसांच्या किलबिलाटात मनाचा आवाज कधी ऐकताचं आला नसेलं .......मनाचं आणि माझं आजचं माझं पहिलं संभाषण ......वयाची वीस वर्षे पार केली पण कमाई?? शुन्य ....!!!! कमाई पैसांची नाही बरं का! कमाई विश्वास,निष्ठा,कर्तव्य,माणसं काय कमावलं मी?? अकाली मृत्यु आलाचं तर??? आयुष्यातल्या खुप गोष्टी करायच्या राहुन गेल्या का तर लोक काय म्हणतील??? मनाने घातलेली साद कधी ऐकुचं आली नाही, माणसांच्या गर्दीत, वाहणांच्या गर्दीत, virtual युगाच्या नव्याने उदयास येणार्या आपल्या संस्कृती पुढे मनाचा आवाज पारचं दबुन गेलाय, हिरमुसलेल्या या मनाची साद ऐकु आली तरी आयुष्यात खुप काही कमावल्याचं समाधान ....
                                                                                                                                   

माझ्याबद्दल थोडेसे..:

नमस्कार मी सुकेशनी दिगंबर कदम ,काव्य समर्पण ग्रुप ची संस्थापक अध्यक्षा.वाचनाची आवड आहे,कथा लिहायला जास्त आवडतात..भावी आयुष्यात लेखिका व्हायला आवडेल

Post a Comment

 
Top
X