नमस्कार मी गणेश निंबाजी साळुंखे रा-
मारवड,ता-अमळनेर, जि-जळगाव नोकरी- मुंबई पोलीस दल ह.मु-
मुंबई ज.दि.२८.०८.१९८८ शिक्षण- B.A.D.ed
साहित्यप्रवास:- हुरहुर
मनाची आवड लिखाणाची हिच सुरुवात साहित्य प्रवासाची.
कॉलेज
जीवनापासुन म्हणजे १२ वी पासुन मला आपले विचार ,कल्पना,भावना,सामाजिक
जाणिव,समस्या ,उपाय लोकांपर्यंत पोहचवावे असे सारखे वाटायचे अन येथुनच ख-या अर्थाने माझी
कविता करायला सुरुवात झाली.मुक्तछंद प्रकारात लिहु लागलो अन माझ्या कुटुंबावर
आलेल्या संकटांमुळे तसेच नियतीने माझ्या जीवनात निर्माण केलेल्या समस्या यांना मी
प्रेमाने सोडवु पाहत होतो आणि बघता बघता प्रेमकवीच बनुन गेलो.
२०१२ मध्ये माझा
पहिला काव्यसंग्रह ‘ एक वार काळजावरचा ' पुणे येथुन महाजन ब्रदर्स पब्लिकेशन द्वारे प्रकाशित
झाला.आणि मग फेसबुक वर देखिल सगळे कवी म्हणुनच संबोधु लागले.शेवटी एकच सांगतो मी
सत्य लिहिण्याचा आणि मानवी जीवनातील नातेसंबंध सुखदुख भावनिक समस्या माझ्या
कवितांमधुन मांडण्याचा प्रयत्न करतो.
म्हणाल तर कवी आहे,
नाहीतर शब्दांचा गुलाम आहे
शब्दांचीच पुजा करत राहणे
हाच माझा धर्म आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938
नाहीतर शब्दांचा गुलाम आहे
शब्दांचीच पुजा करत राहणे
हाच माझा धर्म आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938
kupch chan sir.......
ReplyDelete