सकाळ पासुन वैतागलेली मी नुस्ता राग, चिडचिड कंटाळा आला होता सगळ्याच, रागाच्या भरात पाकीट, फोन घेतलां आणि दणकन दरवाजा आदळुन मी घराबाहेर पडले, घरापासुन थोड्याच अंतरावर असलेल्या बागेत जाऊन बसले ....माझ्या नेहमीच्या ठिकाणी जेव्हा मला एकटं, एकाकी वाटतं किंवा जेव्हा माझा रागाचा पारा चढलेला असतो तेव्हा नेहमीच मी इथं येऊन बसाते .....आजही आले रागाच्या भरात हातातलं पाकीट जोरात जमिनीवर आदळलं आणि झाडाच्या बुंध्याला टेकुन बसले, हेडफोन्स चा गुंता काढता काढता हेडफोन तुटला आता माञ रागाला पारावरचं उरला नाही, तेवढ्यात कॅंडी क्रश च्या गेम चा आवाज आला .....तो बंद झाला नी लगेच सबवे गेम चा आवाज सुरु .....मनाला थोडं हायस वाटलं चला म्हणजे जगाच्या पाठीवर माझ्याही पेक्षा जास्त रागीट कोणीतरी आहे!! असा विचार मनात चालु होता तोच......

एक मंजुळ आवाज कानावर पडला ...किती उशीर??? ही वेळ झाली का यायची??? किती वाट पाहायची माणसाने ..... अगं किती ट्रॅफिक आहे माहीतीए ....हुश्य सुटलो बाबा एकदाचा .....त्या ट्रफिक मधुन .....पण,काय गं इथे का बोलावलसं मला??? तिच्या सोबत असलेला पुरुष बोलला ...म्हणजे तुला कळलं नाही मी तुला इथे का बोलावलं ते??? चिडुन ती बोलली .... कमऑन सुधा, सांगितल्याशिवाय कसं कळेल???? आईशप्पथ आज वाढदिवस तर नाही ना हिचा ....तो पुटपुटला ...राहुल: अगं मला तुला सरप्राइज करायचं होतं म्हणुन तुला विष नाही केलं गं मी .....
सुधा:तु फार बदललास हल्ली ....आधी किती प्रेम करायचास पण,आता लग्न होऊन एक वर्ष झालं नाही तर ही अवस्था???? नंतर कसं होईल .....सुधा: वाव!!! तुझ्या लक्षात होतं ...किती छान!!!! राहुल:एवढा महत्वाचा दिवस विसरेल का मी???? बाय द वे हॅपी बर्थडे ......आज लॉंग ड्राइव्ह ला जाउ हा आपण ......मोठ्या अभिमानाने तो बोलला ..... सुधा रडायलाच लागली .....
राहुल:अगं परवाच माझा फोन रिसेट झालाय ना सगळे रिमांईडर डिलीट झालेत .....राहुल खुपचं गोंधळला होता ....काय बोलाव त्याला सुचेना.. समजावनेच्या आर्विभावात तो बोलु लागला ..... राहुल: हा हा हा .....अगं मी तर मस्करी करत होतो ...तुला खरं वाटलं का ....वा!!! राहुल दी ग्रेट आता एक्टर पण झाले .....वेडा बाई .... सुधा: गप्प बस!!! तुला आठवलं नाहीए अजुन ....
आता कुठे सुधाचा राग निवळला होता .....बरं आता सांगशिल का??? आज काय ते???सुधा:काय???? आपल्यातल्या गोड क्षणांना लक्षात ठेवण्यासाठी तुला रिमांयडर लागतात .....शी जा तु बोलु नकोस ..... राहुल: तसं नाही गं ....कामाच्या धकाधकीत माणुस विसरु शकतं ना!!! आणि गोड माणसांसोबतच्या गोड आठवणींवर विरजन पडु नये म्हणुन रिमांईडर गं ......
सुधा आता राहुलला चिडवण्याच्या हेतुने बोलली ...गजरा .....????विसरला अशील ना??? गजरा सोड रे झेंडु चं फुल तरी आणायचं ना!!!! बरं मला सांग लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे की ......राहुलही तिची मस्करी करत बोलला .....अगं ज्या दिवशी जन्मठेप मिळाली तो दिवस विसरेल का मी??? सुधाने लाडीवाळ पणे,त्याला मारलं अन् त्याच्या खांद्यावर विसावली ...... सुधा: आजच्या दिवशी किनई आपण पहिल्यांदा भेटलो होतो .....तुला आठवतं का रे तु रोज माझ्यासाठी गजरा आणायचास .....आता माञ राहुल ने जीभ अलगद दातात दाबली ही त्याची दुसरी चुक तो साफ विसरुन गेला होता .....
हे सगळं संभाषण मी चोरुन ऐकत होते, म्हणजे मला ऐकु आलं म्हणुन ऐकलं मी .....मी काही ऐकायला गेले नव्हते पण,ईतकी मज्जा वाटतं होती ना मला राग तर कुठच्या कुठे पळाला माझा ....किती सुंदर असतं ना नवरा -बायको चं नातं, आणि किती माफक अपेक्षा असतात एकमेकांकडुन ....ऑफिस मधुन आल्यावर हसर्या चेहर्याने स्वागत करावं ही नवर्याची तर, पोळया भाजताना पोळलेले हात हातात घेऊन दमलीस का गं असं म्हणावं ही बायकोची पण,रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या साथीदाराशी आपुलकीने बोलणंच सोडुन दिलयं आपण म्हणुनचं अगदी छोटे छोटे वाद एवढे विकोपाला जातात की वर्ष भरातचं घटस्पोट घेतात संसाररुपी वेल बहरण्याआधिचं जळुन जातो सुकुन जातो....एकदा बायकोला प्रेमाने बोलुन बघा आणि बायकांनी विनाकारण नवर्याची चौकशी,संशय घेणं बंद करुन पाहाच..... दोघांनी हे करुन बघा आयुष्य कसं आनंदून जाईल                                                                                  
.                                                                                  
(टीप: कोणाचही बोलणं चोरुन ऐकु नका नाहीतर होणार्या नुकसानास मी जवाबदार नाही ....हुकुमावरुन ......)



माझ्याबद्दल थोडेसे..:

नमस्कार मी सुकेशनी दिगंबर कदम ,काव्य समर्पण ग्रुप ची संस्थापक अध्यक्षा.वाचनाची आवड आहे,कथा लिहायला जास्त आवडतात..भावी आयुष्यात लेखिका व्हायला आवडेल

Post a Comment

 
Top
X