अभिनंदन!!! तुम्ही आई होणार आहात, हे शब्द ऐकुन तिला जमिनीवर नसुन आसमंतात असल्याचा भासचं तिला होऊ लागला, ही बातमी कळल्यापासुन साधारण शंभर वेळा तरी तिने स्वता:ला आरशात न्याहाळलं असेल, लाजेने लाल झालेला तिचा नाजुक चेहरा अधिकचं मोहक दिसत होता, कधी एकदा ही गोड बातमी आपल्या नवर्याला देईल असं तिला झालं होतं पण,तिची निराशाच झाली त्याने फोनचं नाही रिसीव्ह केला, आनंदाने उजळलेला तिचा चेहरा क्षणार्धात मलुन झाला ....ती आता फक्त त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसली होती ......तो आला हाताच्या नखांसोबत ती खेळत होती, रोहन आल्यावर त्याला पाणी देऊन ती चहा करण्यासाठी किचन मध्ये गेली, येऊन बघते तर काय रोहन सोफ्यावर बसला होता छताकडं बघत बसला होता, वैशाली त्याच्या शेजारी बसली आणि लडिवाळ पणे त्याला सांगु लागली ..... वैशु:आज मी हॉस्पीटल मध्ये गेले होते ..... रोहन: का??? काय झालं बरं वाटतयं ना तुला???? तिच्या कपाळावर हात ठेऊन चिंताग्रस्त होऊन तो बोलु लागला ...... वैशु: अरे,किती टेंशन घेतोस???? मी एकदम ठनठनीत आहे ...एक गुड न्युज आहे पप्पा तुमच्यासाठी .....हसतं ती बोलली .... रोहन: गुड न्युज?? आणि,पप्पा का म्हणतेस मला???? वैशु:अजुन काही दिवसांनी म्हणेल ना तुला कोणीतरी पप्पा!!!! रोहन: म्हणजे?? तु..... वैशु:हो, बरोबर i am pregnent .....त्याचं बोलनं पुर्ण व्हायच्या आत ती बोलली ..... रोहन पार गोंधळुन गेला त्याला काहीच कळेना, लाजेने, आनंदाने फुललेल्या वैशु च्या चेहर्यावर दुखा:ची छटा पसरावी असं त्याला वाटेना पण,किती दिवस तिला अंधारात ठेवणार?? हे बघ वैशु आपल्याला एवढ्यात हे बाळ नकोय ....मी उद्याच डॉक्टरांची appointment घेतो, आपण हे बाळ,abort करायचं आहे .....हे सगळं बोलताना तो तिच्या शेजाराचा उठला आणि तिच्या कडे पाठ करुन उभा राहिला ...अश्रुंनी डबडबलेले डोळे लपवण्याचा प्रयत्न तो करत होता .....स्वप्न भंग पावलेली वैशु खुळ्यागत रोहन च्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत होती .....मोठ्या शिताफीने डोळ्यातलं पाणी पुसुन तो तिच्या जवऴ गेला तिच्या मांडीवर डोकं ठेऊन शांत पडुन राहिला ,कंठ दाटुन आल्यामुळे काहीच बोलता येईना त्याला ......दोघांमध्ये भयान शांतता पसरली, बर्याच वेळा नंतर वैशु बोलली पण,का?? का नकोय तुला बाळ?? पळुन जरी आले असले तरी, लग्न झालयं आपलं ....तु असा माझ्यापासुन माझ्या मातृत्वाचा हक्क हिराऊ नाही शकतं ..........ती हमसुन हमसुन रडु लागली .....नाही गं हक्क कुठं हिरावतोय मी?? मी फक्त आता नको असं म्हणतोय ....बाळाची स्वप्न तुझ्यापेक्षा जास्त मी रंगवलीत, आपल्याला एक गोड मुलगी असेल पप्पा करतं ती घरभर माझ्या मागे मागे फिरेल ....मी तिला फुलासारखी जपेन ......दोन्ही डोळ्यातुन आसवं टपकु लागली ...तिला मारुन तु तुझ्याच हाताने स्वता:च्या स्वप्नांचा गळा दाबतोएस रोहन .....करड्या स्वरात ती बोलली ....अगं अस करताना मलाही आनंद होत नाहिए पण,मला सांग आपल्या बाळाला एक सिक्युअर लाईफ द्यायची ना? आता मी सक्षम नाही गं त्याच्या संरक्षण,पोषणासाठी .....समजवण्याच्य़ा आर्विभावात तो बोलला ....अरे, मी पण शिकलेली आहे मी पण नोकरी करते होईल सगळं ठीक ईच्छा तिथे मार्ग ......ती बोलली ,ईच्छा आहे गं मार्ग नाहीए ...ापल्या बाळाच्या जन्मानंतर साधं हक्काच छप्पर नसेल डोक्यावर !!! हा घरमालक असा माथेफिरु आज बाळा म्हणुन कुरवाळतो तर उद्या लात मारुन हाकलायला कमी नाही करणार ..जिथं आपल्याच राहण्याचा पत्ता नाही तिथॆ बाळाची आबळं करायची का? तु छान नोकरी कर माझ्या पगारावर घर चालवु तुझ्या पगारावर हफ्ता देऊ किमान हक्काचं छप्पर तरी असेल, रोहन बोलला .....हे सगळं तिला पटलं पण,नुस्त्या चाहुलीने तिचं आय़ुष्य पालटुन गेलं होतं ...दु:खी अंतकरणाने ती गर्भपाताला तयार झाली ..... मातृत्व!!! स्ञीला मिळालेली एक विलक्षण देणगी नऊ महिने मरणयातना सहन करुन नवीन जीव जन्माला घालण्याएवढं श्रेष्ठ कार्य दुसरं नाही .......असं म्हणतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, तसचं मरणयातना सहन केल्याशिवाय नवीन जीव जन्मास येत नाही .....मातृत्वाची भावना एवढी सुखावह असते की त्या पुढे कोणतीच भावना श्रेष्ठ नाही ......ज्या बाळाला नऊ महिणे पाहिलेलं नसताना त्याच्याबद्दल जे वास्त्यल्य आईच्या मनात असतं त्याला म्हणतात खरं प्रेम ....किती आघात होत असेल त्या मातेला जीचं बाळं तिच्या पासुन अमानुष पणे हिरावलं जातं का तर ती मुलगी आहे म्हणुन ......!!!! पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तसचं स्ञी झाल्याशिवाय मातृत्व म्हणजे काय हे कळणार नाही ..

माझ्याबद्दल थोडेसे..:


नमस्कार मी सुकेशनी दिगंबर कदम ,काव्य समर्पण ग्रुप ची संस्थापक अध्यक्षा.वाचनाची आवड आहे,कथा लिहायला जास्त आवडतात..भावी आयुष्यात लेखिका व्हायला आवडेल

Post a Comment

 
Top
X