माझं गाव प्रेमाच ,
जीवनाचं आणि आस्मितेच ,
हृदयामधल्या स्पंदनाचं ,
माझे गाव प्रेमाचे .
क्षणोक्षणीच्या आठवणीचे,
भावनांचे आणि सुखांचे,
नात्यांमथल्या विसाव्यांचे ,
हे गाव माझे प्रेमाचे ,
संस्कृतीच्या वारशाचे ,
गोड बोलीच्या मनाचे ,
मानसांमधल्या एकात्मतेचे,
हे गाव माझे खुप प्रेमाचे ,
भरगच्च भरलेल्या मानसांचे ,
मानसांमधल्या समतेचे ,
मानुसकीने ओथंबलेले ,
माझे गाव खुप प्रेमाचे .
समतेचे ,विषमतेचे ,
भरवशाचे ,सुखा-दुखःंचे ,
आणि आठवणींचे ,
माझे आपुलिकचे गाव खुप प्रेमाचे.
संकलन - सुरज पाटील
Post a Comment