"कधी कधी ....."
कधी कधी;
माणसांच्या गर्दीतही मन माझं एकटचं असतं ...
कधी कधी ;
चिंब ओल्या पावसातही मन माझे कोरडेच असते ....
कधी कधी;
चांदण्या राञी आभाळ माझं भकास असतं .....
कधी कधी;
मायेच्या गर्द सावलीतही वेदनेची झळ असते....
कधी कधी;
खुप काही कमवुनही झोळी माझी रिकामीच असते....
कधी कधी;
सभोवताली सगळे असुन ;आपलं असं कोणीच नसतं.....
         -सुकेशनी दिगंबर कदम

Post a Comment

 
Top
X