अवनी लक्ष्मीबाई जाधव,पाटील सरांनी हे नाव पुकारलं आणि वर्गातील सर्वांचं लक्ष अंग चोरुन उभ्या असलेल्या अवनी कडे गेलं .....सगळे आपल्याकडेचं बघताएत हे कळताच तिला ओशाळल्यासारखं झालं; ?."present sir"कशीबशी ती बोलली आणि खाली बसली....आज पहिल्यांदा असं झालं असेल;तिला तिच्या नावाची लाज वाटु लागली ....एक -एक क्षऩ तिला युगासम भासु लागला ....कसं बस ते लेक्चर संपलं तशी ती धावतचं घरी आली....घर कसलं? कोंडवाडाचं दहा बाय दहा ची ती खोली त्या खोलीतल्या जुन्या पेटीवर ठेवलेल्या त्या टेबल फॅन कडे एकटक ती पाहतं होती; काही शब्द तिच्या कानावर सारखे आदळत होते ....कॉलेज मधला तो रोल कॉल तिला गरगरल्या सारखं झालं .....तिने आज आईच म्हणनं डावलऩ्याचा प्रयत्न केला ......आईने बंदी केलेली असतानाही तिने आज ती पेटी उघडन्याचं ठरवलं .....तिने तो फॅन उचलुन खाली ठेवला आणि तीने ती पेटी उघडली. तिचे डोळेचं चमकले .....तिने त्या पेटीतली प्रत्येक वस्तु स्व:तावर चढवली आणि लाजत मुरडत आरशात पाहु लागली .....तिची आई तिच्या मागे उभी राहुन अवऩी कडे पाहु लागली ; ती कोसळलीच जोरजोरात स्व:ताला मारुन घेऊ लागली ....अवनीला काहीचं कळेना ....ती आईला समजाऊ लागली .....तिची आई म्हणु लागली ...."न्हाय या साटी रातोरात गाव सोडलं न्हवतं वाटलं हुत लय शिकुन मोठी होसिल पर तुला बी ओढ ह्या असल्या जिदंगीची...लय लहान हुते तवाच देवदासी सोडलं मली लय जीव हुता बापाचा ......मला सोडलं आण स्वता गेला वर .....लृ सपान असतात गं ;लगीन करीवं सुखाचा संसार करावा पर आपल्या नशिबी हे असलं लचके तोडुन घेनचं येत ......दारोदार जोगवा मागत फिरायचं; देवदासी हुते की भोगदासी कऴना ......झुलवा लावला एकासंग ..सहा महिन्याचा संसार ....त्यात तुजी चाहुल लागली ठरीवलं लय सिकवायचं बाप गेला सोडुन तुली हित आणलं पर तु?????? अवनी हमसुन रडु लागली दोघी माय लेकी खुप रडल्या .....ऩिर्धाराने अवनी उठली ...दागिने उतरवुन ती बाहेर गेली पाठमोर्या आकृतीकडे कौतुकाने लक्ष्मी पाहु लागली ..... -सुकेशनी दि. कदम

Post a Comment

 
Top
X