काय गंमत पण आहे बोलण्यात  आपण  
"शब्द" किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या 
"स्थाना"वरून निश्चित ठरवतो.

नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला 
"खड्डा" म्हणून हिणवतो,
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला 
"खळी" म्हणून खुलवतो.

भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला 
"डाग" म्हणून डावलतो,
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला
"तीळ" म्हणून गोंजारतो.

तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला
"जटा" म्हणून हेटाळतो,
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला 
"बटा" म्हणून सरकवतो.

असच असतं आयुष्यात आपलेही
"सोबती"नेच आपण तसे घडतो,

चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो
"योग्य" सोबतीनेच अधिक बहरतो.

माझ्याबद्दल थोडेसे..:


नमस्कार मी अभिजित पाटील ,काव्य समर्पण ग्रुप चा संस्थापक.लहान पणा पासूनसाहित्या चे वेड होते.पण संगणक क्षेत्रा मध्ये पदवी घेतल्याने संगणका शी लग्न करावे लागले
Follow him @ Apatil850@g | Facebook

Post a Comment

 
Top
X