शृंगार..
करुनी शृंगार ही 
लावण्य नार आली..
करुनी वार काळजावर 
निघुनी गेली..।।

जरीकाठ नौवार नेसुनी 
लावण्य सुंदरी आली..
डोकी अंबड़ा बांधुनी 
सुंदरी आली..।।

हाती कांकणांची 
माळ घालुनी आली..
जसे नभी पक्षांची
किलबिल झाली..।।

पायी पैंजणांचा ऋणुझुणु 
आवाज करत आली..
जशी वाजली गाजली
आरती राउळी..।।

मोत्याची माळ गळा 
ओवुनी आली..
अंबड्यात गजरा ती
माळुन आली..।।

नाकी नथनी मोत्यांची
नाजुक घालुनी आली..
कानी कुंडले डुलवित
लावण्यखणी आली..।।

            - शुभम जाधव

Post a Comment

 
Top
X