प्रेमवेड्या कवितेत रस नाही...!!!
मधपोळीत मध नाही,
दान्यात कस नाही..
ओसाड झाले मन,
कवितेत रस नाही..!!
दान्यात कस नाही..
ओसाड झाले मन,
कवितेत रस नाही..!!
पारावर जोक नाही,
गावात लोक नाही..
अस्वस्थ मनास,
रात्रभर झोप नाही..!!
गावात लोक नाही..
अस्वस्थ मनास,
रात्रभर झोप नाही..!!
जंगलात वाघ नाही,
रानात साग नाही..
ना उरले कुणी जिवलग,
जीवास कुणाचा धाक नाही..!!
रानात साग नाही..
ना उरले कुणी जिवलग,
जीवास कुणाचा धाक नाही..!!
पाटात पाणी नाही,
मैफलीत गाणी नाही..
मंदिरे पडली ओसाड,
तेथे संतांची वाणी नाही..!!
मैफलीत गाणी नाही..
मंदिरे पडली ओसाड,
तेथे संतांची वाणी नाही..!!
लेकराला आई नाही,
शाळेत आता बाई नाही..
मोडून पडला पेन पण,
पेनात आता शाई नाही..!!
शाळेत आता बाई नाही..
मोडून पडला पेन पण,
पेनात आता शाई नाही..!!
तुमचं पण मला तर,
काहीच कळत नाही..
सगळेच म्हणु लागले आता,
प्रेमवेड्या कवितेत रस नाही...!!!
-प्रेमवेडा राजकुमार
काहीच कळत नाही..
सगळेच म्हणु लागले आता,
प्रेमवेड्या कवितेत रस नाही...!!!
-प्रेमवेडा राजकुमार
धीरज चव्हाण
माझ्याबद्दल थोडेसे . . . . .
नमस्कार मी धीरज ,कॉम्पुटर च्या शेवटच्या वर्षा ला शिकतोय लहानपणापासून नेहमी काहीतरी वेगळे करायची आवड असल्यामुळे आज आमच्या कविता च्या ब्लॉग चे एडीटर म्हणून काम करतो आहे.
खुप सुरेख,अप्रतिम....
ReplyDelete