पाणावलेले डोऴे फक्त तुझीच आठवण काढतात.....





आजही आठवतं मला;
एक घास चिऊचा,
एक घास काऊचा
म्हणत ,भरवलॆलं जेवन......
तु सांगितलेल्या परीच्या गोष्टी....
तु शिकवलॆली बडबड गितॆ....
तु भरवलॆल्या वरन भाताची सर आजच्या पिझ्झाला नाही गं.....
तुझ्या परीच्या गोष्टींपुढे आजच्या कार्टुनला काहीच किंमत नाही....
कपडे धुवायला गेल्यावर केलेली मस्ती .....
तुझ्या हातच्या पुरन पोळीची चव आजही जिभेवर रेंगाळते गं .....
आजही तुझ्या मांडीवर झोपुन त्याच गोष्टी ऐकाव्याशा वाटतात......
हट्ट करून रुसुन बसावसं वाटतं.....
खरचं तुझ्या मायेच्या सागरात चिंब भिजावसं वाटत.....
           
                                             -सुकेशऩी दिगंबर कदम...

Post a Comment

 
Top
X