लहान पण देगा देवा ......

 

जेव्हा मी लहान होते.......
जेव्हा मी लहान होते;पक्षाप्रमाणे उंच-उंच भरारी घ्यावीशी वाटायची.....
पण आज माञ;
पाय जमिनीवर राहावेत असं वाटतं.....
जेव्हा मी लहान होते ;
रस्त्यावरुन वाहणाऱ्या  पाण्यात होडी सोडायची मज्जा वाटाय़ची....
पण आता माञ;
पाय भिजतील म्हणून रस्त्यावरुन चालने ही नकोसे वाटतं.....
जेव्हा मी लहान होते;
पावसात मनसोक्त भिजायचे,चिखलात लोऴायचे .....
पण आता माञ;
खोट्या पावसात raindance करण्यातचं मन माझं समाधानी......!!!!!
जेव्हा मी लहान होते .....
पारले जी चं चॉकलेटचं गोड लागायचे 
पण आज माञ सिल्क चं चॉकलेटही मन भरु शकतं नाही.........
पण आज माञ ........
  गेले ते दिवस अन् उरल्या त्या निरागस आठवणी....फक्त आठवणी..!!!!!
                                           
                                                           -सुकेशऩी दिगंबर कदम

Post a Comment

 
Top
X