ओळखलंत का मुकादम मला?
फडात आला कोणी
चेहरा होता मरुकुडलेला
डोळ्यांमध्ये पाणी
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून..
इंजीनियर व्हायचं स्वप्न माझं
गेलं अर्धवट राहून..
आयुष्याची सहा वर्षे
डिग्रीसाठी घातली
होती नव्हती तेवढी मी
सगळी पुस्तके वाचली
गर्लफ्रेंड तुटली
फॅमिली सुटली
होते नव्हते  गेले
मुकादमाकडुन उचल घेणे
माझ्या नशिबी आले
बैंकिंग MPSC देऊन
मी पुन्हा लढतो आहे
जॉब करुन पास होत नाही
म्हणून जॉबही सोडला आहे
फडात ऊस तोड तोडतो आहे
४ म्हशी पाळतो आहे
माझ्यासंगे मोळ्या उचलनारी
बायको आता शोधतो आहे
खिश्याकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत मुकादम
जरा एकटेपणा वाटला
मॅांड झाला कोयता तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवुन फक्त तोड म्हणा .....
                                 
  कवि कोयतेश्वर 🔪
                              संकलन -अभिजीत पाटील 



Post a Comment

 
Top
X