अगदी मन गहिवरून याव असा लोकल मधला एक प्रसंग .
एक कॉलेजमधल्या तरुण - तरुणींचा घोळका लोकलमधे अगदी दाराजवळच उभा होता.
काही मिनिटात पुढचं स्टेशन आलं ....
लोकांची चढ़ उतर झाली अन लोकल पुन्हा सुरु.......
तेव्हाच अगदी पाच वर्ष वयाची एक चिमुकली नि सोबत तिचा अडीच वर्षाचा भाऊ डब्यात शिरले .
दोघेजण गाण म्हणत होते कारण त्यांना घ्यायचा होता खाऊ
चिमुकली गाण म्हणत होती.
भाऊ चीपळ्या वाजवित होता फ़क्त एक रुपयासाठी तो डब्यातल्या
प्रत्येकाला विनवणी करत होता.
काही भली माणस त्यांना मदत करत होती नि काही शिकलेली जानवर त्यांच्या लाचारिची मस्करी करत होती.
ती दोघेही अशिक्षित असल्याने जमेल त्या पद्धतीने गाणे म्हणत होती.
दाराजवळची मित्रांची टोळी त्यांना क्षणोक्षणी हिणवत होती....
तोच एक तरुण ..........
" ए आगे चल ये , तुम लोगो का रोज का नाटक है........"
मित्रांनो असा कधी झालय का ?
आज जेवण केलयं म्हणून उद्या भूक लागत नाही.
मायेच आभाळ फाटलेल्या लेकराना कुणीही निवारा देत नाही .
मग क्षणभर मीही त्या चिमुकल्यांच्या डोळ्यांत बघितलं .......
नशिबाचा हा घात बघून त्यांचे अश्रु थांबत नव्हते.
श्रीमंतांच्या पोटी जन्मलेली गिधाडं या केविलवाण्या रडण्यावरही हसतचं होते.
शेवटी रडता रडता त्यांचेही डोळे क्षणात कोरडे झाले.
पुढील स्टेशन आल तेव्हा दोघेही हसत हसत निघून गेले...
क्षणभर मनात पुन्हा विचार केला........
कदाचित त्या दोघांनी रोज रडून रडून आता हसत जगणं शिकलेलं असाव....
डोळ्यांतील त्या अश्रुंनीच पाण्याची तहान भागवणं शिकल असावं......
मित्रांनो....
श्रीमंतांच्या पोटी जन्मल्यावर,
गरीबाच्या लेकरांना हिणवू नका.
जर कुणास क्षणभर आनंद देवू शकत नसाल
तर
कमीतकमी त्यांच मन दुखवू नका....
कुणास ठावुक अशी परिस्थिती पुढच्या जन्मी हिनवनाऱ्यावरही येईल.
त्यावेळी त्यांना या जन्मीच्या नीच कृत्त्यांची जाणीव होईल.........
येथे जे काही लिहलय ते फ़क्त कविता म्हणून वाचू नका....
"कुणाला जर मदतीचा हात देवू शकत नसाल
तर
त्यांच्या स्वप्नांना अस पायदळी तुडवू नका".

Post a Comment

  1. हृदयद्रावक प्रसंग......

    ReplyDelete

 
Top
X