वेळ आली तर तुलाही सांगीन,
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
... मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुतीदेऊन
क्षितिजाकडे कस बघायचंअस.
Post a Comment