लग्नाच्या वेळी नटुन-थटुन बोहल्यावर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहताना एका बापाच्या मनात येणारे विचार......

बाळा,किती मोठी झालीस गं;

मला चॉकलेट नाही आणलं तर मी बोलणारचं नाही!

असा हट्ट करणारी ....आज एवढी मोठी झाली;

घरटं सोडुन दुर चाललीये...

तु या जगात आलीस अन्;
माझा आनंद गगनात मावेना....

माझी परी,वाघीन अशा उपमा तुला मी देऊ लागलो.....

आठवतं का गं तुला;
माझं बोट पकडुन टाकलेलं एक-एक पाऊल...

सायकल चालवताना घेतलेला आधार....
भावांसोबतच्या मस्तीत आपण केलेली एकी....

दहाविच्या पेपर ला जाताना माझ्या उबदार मिठीत घेतलेला विसावा....

छोट्या-छोट्या गोष्टींसाठी गाल फुगवुन बसायचीस....

माझ्या प्रमोशन च्या वेऴेस माझ्याबद्दल भरभरु:ते शब्द....

बाळा तु आता ऩविऩ आय़ुष्य जगऩार आहेस....

कोणतिही समस्या आली तर ;
हक्काने माझ्या मिठीत मन मोकळं करशील ऩा गं......

          -सुकेशऩी दिगंबर कदम

Post a Comment

 
Top
X