एक संवाद ....... बर्याच दिवसांनी बागेत पहुडताना माझं लक्ष अंगणातील मोगर्यावर गेलं.....थोडा रागचं आला मला; तो माझ्याकडे पाहुन मिश्किलपणे हसत होता .....त्याचं ते हसणं पाहुन मला ओशाळल्यासारखं झालं .....मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथुन निघुन आले ....हल्ली त्याचा तो दिनक्रम चं झाला होता ....मला पाहीलं की तो हसायचा .....मी त्याला विचारलं "का रे हसतोस? " यावर उत्तर न देता तो फक्त हसला .....आता माञ मला राग अनावर झाला ;तळपायाची आग मस्तकात जायला लागली ....तरीही माझ्याकडे पाहुन तो हसतचं होता ...मी मनाशी पक्क केलं आज काय तो निकाल लावायचाच .....तावातावाने मी त्याच्या जवळ गेले ; पालवीच्या कुशित पहुडलेलं ते फुल माझा रौद्रावतार पाहुन काहीसं घाबरलचं ....आता आपलं काही खरं नाही याची कल्पना बहुधा त्याला आली असावी ....तो अंग चोरुन बसला होता ....रागात, आवेगात मी बोलत होते ....बोलत कसली होते आगचं ओकत होते ...... मी: का रे? का हसतोस तु? मोगरा: नाही गं,मी तुझ्यावर हसतं नाहीए! परिस्थिती वर काळावर हसतोय! मी: कसली परिस्थिती?? कसला काळ?? मोगरा:अगं,हळु किती ओरडतेस?? माझ्या ह्या ईवल्या-ईवल्या कळ्या बघ किती भेदरल्यात!!! (मस्करीच्या सुरात तो म्हटला) मी: विषयांतर करु नकोस!!!! (वैतागुन म्हणाले) मोगरा: तुला आठवतयं का गं?? मागे एकदा तुझी मैञीण आली होती ,सोबत एका गोंडस मुलीला घेऊन ....तुम्ही दोघी किती भरभरुन बोलत होतात माझ्याबद्दल, माझ्या इतर संवगड्याबद्दल ....चाफा, बकुळ,प्राजक्त,जाई-जुई, रातरानी, आमचं रुप, सुगंध बापरे मुठभर मास चढलं अंगावर स्तुती ऎकुन .... मी: मग .....या गोष्टीचा तुझ्या हसन्याशी काय संबंध???? मोगरा :अगं, हो किती घाई?? मला बोलु तरी देशिल का??? मी: बोल ... मोगरा: मग,तुला निरागस मुलीचा प्रश्न आठवतो का??? दिदी मोगरा म्हणजे काय गं???? तिच्या या प्रश्नावर तुम्ही खळखळुन हसलात ...पण, मला माञ खुुप दु:ख झालं काय काळ आलाय नाही?? हल्लीच्या मुलांना मोगरा माहितचं नाही .....प्रेमामध्ये आमचं अनन्य साधारण महत्व होतं एके काळी .....रुसलेल्या बायकोला समजावण्यीसाठी एक गजरा पुरेसा असायचा ....आम्हां फुलांच्या सुवासात राग पार विरुन जायचा .....नकळत आपल्या जोडीदाराच्या ओंजळीत चाफ्याची फुलं टाकल्यानंतर चेहर्यावर येणारं हसु काळाच्या पदड्याआड जातयं ......प्रेयसी पासुन लांब राहणारा प्रियकर रोज तिच्या आठवणीत उशासी गजरा घेऊन झोपतो ....हे हरवतं चाललयं गं हीच खंत वाटते ....तुम्हा मुलींना किमान traditional day cha दिवशी तरी आमची आठवण येते हे नशिबचं म्हणायचे आम्हा फुलांचे नाही का??? त्याचं हे बोलनं मनाला भिडलं शब्दचं फुटत नव्हते कसंबसं स्वता:ला सावरत मी काहीही न बोलता तिथुन निघुन आले ...... -सुकेशनी दि.कदम.

Post a Comment

 
Top
X